हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरे येथील मेट्रो कारशेड कंजूरमार्गला हलवल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार मध्ये वाद निर्माण झाला आहे. मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा मोदी सरकारने केला आहे. त्यानंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केला आहे. लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे असा तिघाडीच्या ठाकरे सरकारचा कारभार असल्याचा आरोप भाजप आमदार आशिष शेलारांनी केला आहे.
तिघाडीच्या ठाकरे सरकारची नवी कार्यपद्धती… विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि भटकवा!
मेट्रो कारशेडचे असेच चालले आहे. pic.twitter.com/Q9RLtedO13— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 3, 2020
मुख्यमंत्री महोदयांनी आरेच्या ऐवजी कांजूरला मेट्रोची कारशेड नेण्याचा निर्णय केला. त्याच वेळेला आम्ही म्हटलं होतं, राज्य सरकारचा यामागे कुहेतू दिसतोय. घोषणा झाली तेव्हाच प्रतिक्रिया देताना आम्ही स्पष्ट म्हटलं होतं. अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र यामुळे मुंबईकरांना त्रास होतोय. आज ज्या पद्धतीच्या गोष्टी समोर येत आहेत. त्यावेळेलासुद्धा सांगताना आम्ही म्हटले होते. मीठागर आयुक्त सॉल्ट कमिश्नरची परवानगी जागा नावावर करताना घेतली होती का?, असा सवालही आशिष शेलारांनी उपस्थित केला आहे.
ठाकरे सरकारच्या अहंकारी प्रवृत्तीनं घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईकरांना त्याच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागतोय. मेट्रोच्या विकासामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारची कार्यपद्धती ही तिघाडीची कार्यपद्धती आहे. पहिल्यांदा लटकवणे, अडकवणे, जागा ट्रान्सफर करताना ज्या पद्धतीच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक होती, ती केलेली दिसत नाही. मीठागर आयुक्तांची परवानगी घेतलेली दिसत नाही.
अडकवणे, जनतेला भटकवणे आणि चुकीची माहिती देऊन जनतेला भ्रमित करणे, असा यांनी निर्णय घेतला आहे. मेट्रोच्या प्रकल्पात माननीय उद्धव ठाकरेजींनी घेतलेला निर्णय हा लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे अशा पद्धतीचा कारभार आहे. मुंबईकरांच्या माथी दिरंगाई तुम्ही थोपवली आहे. यामध्ये राज्य सरकार सर्वस्वी दोषी असल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’