शरद पवारांचे वक्तव्य म्हणजे “चोर की दाढी में तिनका” ; आशिष शेलारांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्याच्या सहकार क्षेत्रात केंद्राला हस्तक्षेपाचा अधिकार नाही असे शरद पवारांनी म्हणणे म्हणजे चोर की दाढी में तिंखा असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी टोला लगावला. कराड येथील शासकीय विश्रामगृहात पक्ष संघटना वाढीसाठी बैठक घेतली होती. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, आमदार जयकुमार गोरे, डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर, भरत पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे आदी उपस्थित होते

आशिष शेलार म्हणाले, मोदी सरकारने संमत केलेले तिन्ही कृषी कायदे महाविकासआघाडी रद्द केले आहेत का हे सांगावे. महाराष्ट्र विधानसभेत त्यांनी कृषी कायद्यांना तत्त्वत मंजुरी दिली आहे. त्यात थोडा बदल सुचवला आहे. शिवसेनेने तर लोकसभेत मोदी सरकारच्या कृषी कायद्याला संमती दिली होती आणि राज्यसभेत पळ काढला होता तर राष्ट्रवादीने दोन्ही सभागृहात विरोध केलं होता असेही काही नाही. मग त्यांनी कृषी कायद्या विरोधात आंदोलन का केले असा सवाल करत हात काम ना दाम आणि फुकटचा घाम असा टोला त्यांनी लगावला.

महाविकास आघाडीने सुचवलेल्या सुधारणेसाठी भाजपा तयार आहे. मोदींच्या कृषी कायद्याला तत्वत मंजुरी राष्ट्रवादी व शिवसेना देण्यात आमच्यासोबत आहेत यामध्ये केवळ काँग्रेस एकटा पडला असल्याचे आशिष शेलार म्हणाले.