हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना- राणे वादाच्या पार्श्वभूमीवर राऊतांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी यावर भाष्य करत संजय राऊतांना अंतर्गत शत्रूपासून धोका आहे असं म्हणल आहे.
आशिष शेलार म्हणाले, संजय राऊत यांना पक्षांतर्गत धोका वाढला असेल. कारण पुढेपुढे तेच दिसत आहेत आणि त्यामुळे शिवसेना पक्षाचं नेतृत्व करताना ते दिसत आहेत. सुरक्षा वाढवताना सरकारी यंत्रणांनी धोका कोणापासून आहे हे पाहावे. आमचे म्हणणे आहे की धोका हा अंतर्गत शत्रूंपासून आहे, असं आशीष शेलार यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांच्या ताफ्यात दोन अतिरिक्त एसपीयूचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यांना स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या एकूण 6 शस्त्रधारी जवानांची सुरक्षा देण्यात आली आहे. या शिवाय 12 पोलीस जवानांसहीत साध्या वर्दीतील पोलिसांचा समावेशही त्यांच्या सुरक्षेत करण्यात आला आहे. राऊत यांना सध्या वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.