नरेंद्र मोदी हे तर हनुमान, कोरोनाची लस म्हणजे संजीवनी ; भाजप नेत्यांने उधळली स्तुतीसुमने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी एम्स हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस घेतली. आपण सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाला हरवूया अस आवाहन त्यांनी केलं. दरम्यान भाजप नेते अश्विनी कुमार चौबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तोंड भरून कौतुक केलं. नरेंद्र मोदी हे हनुमान आहेत असं उद्गार त्यांनी काढलं.

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस घेऊन संपूर्ण जगाला आश्वस्त केले आहे. ही हनुमानाची संजीवनी आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमानाप्रमाणे कोरोना लसीची संजीवनी केवळ देशवासीयांना नाही, तर जगालाही देत आहेत, असे कौतुकोद्गार अश्विनी कुमार चौबे यांनी काढले.

दरम्यान, कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात सोमवारी सकाळी नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. एम्समधील नर्स पी. निवेडा यांनी नरेंद्र मोदींना कोरोनाची लस दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घेतल्यानंतर देशातील जनतेलाही कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like