हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राम मंदिराच्या घोटाळा प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळाले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा असा टोला भातखळकर यांनी लगावला.
“राम मंदिर उभारणीला बदनाम कोण करतंय? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, आम आदमी पार्टी, डावे… हे सगळे बाबराचे आणि बाबरीचे समर्थक पक्ष आहेत. त्यांना राममंदिर नकोच होते. आता हे एकवटलेत मंदिर उभारणीत विघ्न आणायला. त्यात भर पडली आहे, ज्वलंत टिपूवादी शिवसेनेची. यांना लक्षात ठेवा. असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं
राम मंदिर उभारणीला बदनाम कोण करतंय? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, आम आदमी पार्टी, डावे…
हे सगळे बाबराचे आणि बाबरीचे समर्थक पक्ष आहेत. त्यांना राममंदिर नकोच होते. आता हे एकवटलेत मंदिर उभारणीत विघ्न आणायला. त्यात भर पडली आहे, ज्वलंत टिपूवादी शिवसेनेची. यांना लक्षात ठेवा…— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 16, 2021
जनता इटालियन लोटांगण घालू, सुपारीबाज रामद्रोह्यांचे ‘राम नाम सत्य हैं’ केल्याशिवाय राहणार नाही,” असंही यावेळी ते म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील नव बाबरवाद्यांचा रामभक्तांपुढे कधीही टिकाव लागणार नाही असं म्हणत शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा असा टोला भातखळकर यांनी लगावला.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.