हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2022 उत्तरप्रदेश निवडणूकीत सर्वच्या सर्व जागा लढवण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. मात्र त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आम्ही 100 जागा लढवणार आहोत अशी घोषणा केली. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
२४ तासांत शिवसेनेच्या ३०३ जागा कमी करून उत्तर प्रदेश निवडणुकीत १०० जागा लढवण्याची संजय राऊतांनी घोषणा केली आहे. औकातीच्या बाहेर घोषणा करायची आणि मग वास्तवाचे भान आले की यू टर्न घ्यायचा. पक्ष असाच चालवतात आणि राज्य सरकारही. मधल्यामध्ये सत्यानाश मात्र जनतेचा होतो आहे. असे टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
२४ तासांत शिवसेनेच्या ३०३ जागा कमी करून उत्तर प्रदेश निवडणुकीत १०० जागा लढवण्याची संजय राऊतांनी घोषणा केली आहे.
औकातीच्या बाहेर घोषणा करायची आणि मग वास्तवाचे भान आले की यू टर्न घ्यायचा. पक्ष असाच चालवतात आणि राज्य सरकारही. मधल्यामध्ये सत्यानाश मात्र जनतेचा होतो आहे. pic.twitter.com/wVBWWNRnM1— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 12, 2021
दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना सर्व ४०३ जागा लढवणार अशी माहिती देण्यात आली होती. मात्र, काही तासांतच पुन्हा ४०३ वरुन खाली येत १०० जागा लढवण्याची घोषणा राऊत यांनी केली आहे. यामुळे उत्तर प्रदेशातील अनेक शेकडो उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. तसेच उत्तर प्रदेशातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सर्व जागा लढवण्याची घोषणा करूनही राऊतांनी यु टर्न घेत १०० जागांची तयारी असल्याचे सांगितले आहे