हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याना २०२२ च्या निवडणुकीत राष्ट्रपती करण्याचा विचार विरोधकांकडून सुरु असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. पवारांकडून जरी या वृत्ताचे खंडन केले असले तरी आता भाजप कडून पवारांवर टीका केली जात आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी यावरून पवारांची खिल्ली उडवली आहे
शरद पवारांनी पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा सोडलेली दिसते असा टोला भातखळकर यांनी लगावला. लोकसभा, राज्यसभेत भाजपाचं बहुमत आहे, त्यामुळे भाजपाचाच उमेदवार निवडून येईल असंही ते म्हणाले आहेत. त्यांना फक्त यातून प्रसिद्धीची ऊर्जा मिळते, याशिवाय काही साध्य होणार नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. यानंतर त्यांनी ट्वीट करताना किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपती पदाचा उमेदवार तरी बनवा असा टोलाही लगावला आहे.
किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपती पदाचा उमेदवार तरी बनवा… pic.twitter.com/2NmzXnQ10j
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 14, 2021
मी राष्ट्रपती निवडणुकीत उतरणार नाही – पवार
दरम्यान शरद पवार यांनी मात्र या वृत्ताचे खंडन केले आहे. 300 पेक्षा जास्त खासदार असलेल्या पक्षाच्या विरुद्ध लढलेल्या निवडणुकीचा निकाल काय असू शकतो हे मला माहित आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मी उमेदवार होणार नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.