हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणीचा आरोप माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला. त्यानंतर अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. दरम्यान देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर देखील भाजप कडून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
भाजप नेते अतुल भातखलकर यांनी ट्विट करत म्हंटल की मी अत्यंत जबाबदारीने सांगू इच्छितो की नुकताच राजीनामा दिलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थान आणि कार्यालयात असलेले 100 कोटीच्या प्रकरणा संदर्भातील पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू आहे. CBI ने तातडीने आवश्यक कारवाई करावी”, असं ट्वीट करत भातखळकर यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केलीय.
मी अत्यंत जबाबदारीने सांगू इच्छितो की नुकताच राजीनामा दिलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थान आणि कार्यालयात असलेले 100 कोटीच्या प्रकरणा संदर्भातील पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू आहे. CBI ने तातडीने आवश्यक कारवाई करावी..@AnilDeshmukhNCP @AmitShah
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 5, 2021
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group