याला म्हणतात नैतिकता तुम्ही थेट क्लिनचीट द्यायचात; मनसेच्या फायर ब्रँड नेत्या रुपाली ठोंबरे यांचा भाजपवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत आरोप केला होता की, गृहमंत्री देशमुख यांनी ए पी आय सचिन वाझे याला दर महिन्याला मुंबईतून १०० कोटी रुपये वसुली टार्गेट दिले होते.या आरोपांना देशमुख यांनी लगेचच स्पष्ट शब्दात नाकारले होते. पण शेवटी नैतिकता म्हणून त्यांनी आज राजीनामा दिला आहे.

या सगळ्या प्रकरणवर मनसेच्या फायर ब्रँड नेत्या रुपाली ठोंबरे यांनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.ठोंबरे म्हणाल्या की “याला म्हणतात नैतिकता.अशी नैतिकता भाजपने कधीच दाखवली नाही हे देखील तितकेच खरे.त्यांच्याकडे मंत्र्यांना थेट क्लिनचीट दिली जायची.त्यामुळे भाजपने कधीतरी अशी नैतिकता आचरणात आणावी,असा सल्ला देत रुपाली ठोंबरे यांनी भाजपला चांगलेच सुनावले आहे.

दरम्यान,गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्री पद कुणाकडे जाईल यावर अनेक तर्क – वितर्क लढवले जात आहेत.कधी हसन मुश्रीफ तर कुणी दिलीप वळसे – पाटील यांचं नाव समोर येतंय.अनिल देशमुख यांच्या सारख्या स्वच्छ चारित्र्याच्या माणसावर असे आरोप झालेत त्यामुळे आता दुधाने तोंड पोळलय म्हणून ताक सुद्धा फुंकून पिण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली आहे.परिणामी कुणीतरी धूर्त,चाणाक्ष आणि शरद पवारांच्या खास मर्जीतलाच नेता या पदी बसवला जाईल अशी एक चर्चा आहे.

हे पण वाचा –

You might also like