Thursday, February 2, 2023

गुलामांचे खिशातले राजीनामे पाच वर्षे बाहेर का आले नाहीत? भातखळकरांचा सवाल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील पाच वर्षे आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सत्तेत होतो पण आम्हाला गुलामासारखी वागणूक मिळाली असा धक्कादायक दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजपने गुलामाची वागणूक दिली म्हणताय मग गुलामांचे खिशातले राजीनामे पाच वर्षे बाहेर का आले नाहीत?; असा संतप्त सवाल भातखळकर यांनी केला आहे.

भाजपने गुलामासारखी वागणूक दिली म्हणता, मग सोनिया गांधींची गुलामगिरी करत सत्तेची लोणी खाणे बरे वाटते का?, असा सवाल भातखळकर यांनी केला. बाळासाहेब ठाकरे गेले. तेव्हा सोनिया गांधींनी त्यांच्या श्रद्धांजलीचं साधं ट्विटही केलं नाही. काँग्रेससोबत सत्तेत राहणं म्हणजे गुलामगिरीपेक्षाही वाईट आहे. हे शिवसेनेने कायम लक्षात ठेवावं, असंही ते म्हणाले.

- Advertisement -

गुलामाचा स्वाभीमान जागण्यासाठी 5 वर्षे जावी लागली – मुनगंटीवार

दरम्यान, गुलामाचा स्वाभीमान जागण्यासाठी 5 वर्षे जावी लागली का असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला. तसेच जर तुम्हाला गुलामगिरीची वागणूक दिली गेली होती, तर एका सेकंदात राजीनामे तोंडावर फेकून मारायचे ना अस म्हणत 5 वर्ष राजीनामे खिशात का ठेवले असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.