Monday, February 6, 2023

2024 नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील; भाजपचा नाव न घेता पवारांना टोला

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीने फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. प्रशांत किशोर- शरद पवार भेटीत देशातील राजकीय विषयावर खोलवर चर्चा झाल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान या भेटीवरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी नाव न घेता शरद पवारांना टोला लगावला आहे.

2024 नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…, असं खोचक ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. भातखळकर यांनी या ट्विटमध्ये पवारांचं नाव घेतलं नाही. मात्र, त्यांनी पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

- Advertisement -

कितीही स्ट्रॅटेजी करा, येणार तर मोदीच – फडणवीस

दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पवार- प्रशांत किशोर भेटीवरून पवारांना टोला लगावला होता. कोणी कितीही स्ट्रॅटेजी करू द्या 2024 ला मोदी च पुन्हा एकदा पंतप्रधान होणार अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली होती.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.