वसुलीचा रिमोटही शरद पवार आहेत का? भाजपचा टोला

sharad pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यातील महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल आहेत असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी नाना पटोले आणि शरद पवारांवर पुन्हा एकदा टीका केली. वसुलीचा रिमोटही शरद पवार आहेत अस नाना पटोले यांना सुचवायचे आहे का असा टोला त्यांनी लगावला.

नाना पटोले म्हणतायत, MVA चे रिमोट कंट्रोल शरद पवार आहेत. त्यांचे म्हणणे शंभर टक्के सत्य आहे. केवळ सरकारचाच नाही तर राज्यात सुरू असलेल्या वसुलीचा रिमोटही तेच आहेत, असे नानांना सुचवायचे आहे का? प्रॉब्लेम फक्त एवढा आहे, की टीव्ही घरात(कडी) बंद असल्यामुळे रिमोट अगदीच निरुपयोगी झालाय. अस ट्विट अतुल भातखळकर यांनी म्हंटल.

नाना पटोले नेमकं काय म्हणाले होते-

शरद पवार हे राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल आहेत आणि ते आमच्यासाठी आदरणीय आहेत, असे नाना पटोले म्हणाले. वेळ येईल तेव्हा मी स्वत: पवार यांना भेटेन परंतु ती वेळ अद्याप आली नाही, असे त्यांनी सांगितले.