हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार याना भेटल्यावर मी त्यांना वाकून नमस्कार करणारच, ती आमची संस्कृती आहे. मात्र, आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात काम वाढवायचं असेल तर शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय पर्याय नाही, त्यांच्यावर टीका-टिप्पणी केल्याशिवाय आम्ही वाढूच शकत नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
यावेळी त्यांनी केंद्रातील कृषी कायद्यावर देखील भाष्य केले. कृषी कायद्यांची अंमलबजावणी दीड वर्षांसाठी थांबणार आहेत. या काळात शेतकऱ्यांशी चर्चा होऊ शकते, विरोधकांना विश्वासात घेतलं जाऊ शकतं. ज्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभामध्ये हे कायदे संमत झाले, त्यावेळी शऱद पवार दिल्लीमध्ये नव्हते. त्या दिवशी पवारांनी संसदेत असायला हवं होतं, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, काल देवेंद्र फडणवीस व संजय राऊत यांनी गळाभेट घेतल्यानंतर त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शत्रूही एकमेकांची गळाभेट घेतात, दोन मित्र भेटल्यानंतर मिठी मारतात, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’