एकत्र लढून पराभव, वेगवेगळे लढले तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार नाही – चंद्रकांतदादांचे महाविकास आघाडीला आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल निवडणूकीत ममता बॅनर्जी यांच्या कडून भाजपचे पानिपत झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंढरपूर पोटनिवडणुक निकालाचा आधार घेत महाविकास आघाडीच्या नेत्यानाच खडेबोल सुनावलं आहेत. हे सर्व जर वेगवेगळे लढले, तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

महाराष्ट्रात माझे आव्हान आहे, कोणत्याही निवडणुकीत चारही पक्षांनी वेगवेगळं लढून पाहावं, मग सर्वांना कल्पना येईल की कोणाला किती बोलण्याची पात्रता आहे. तीनही पक्ष एकत्रित असून, सुद्धा पंढरपुरात आमचा पराभव करू शकले नाहीत, मग हे वेगवेगळे लढले, तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार नाही,” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत भाजपाच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा ३,७३३ मतांनी पराभव केला. महाविकास आघाडीने ही निवडणूक एकत्र लढली होती. तरीही भाजपने इथे बाजी मारल्याने महाविकास आघाडी सरकारसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment