अमित शहांनी शिवसेनेला संपवण्याची भाषा केलीच नाही – चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेला संपविण्याची भाषा अमित शहा यांनी केलीच नाही असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शिवसेना आणि संजय राऊत यांना पराचा कावळा करण्याची सवय आहे, अस चंद्रकांत पाटील म्हणाले. ते चिंचवड येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अमित शहा हे खरं बोलले ते शिवसेनेला फारच झोंबलेलं दिसतंय. पण मुख्य म्हणजे शहा यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा केलेलीच नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांतदादा पुढे म्हणाले, आम्ही कधीच खुन्नसपणे वागलो नाही. गेल्या १४-१५ महिन्यांमध्ये ज्यापद्धतीनं सरकारचा व्यवहार चालला आहे. तो आम्ही पाच वर्ष आमच्याकडे राज्य असताना केला असता शिवसेना संपली असती हे खरं आहे. पण शिवसेनेला आणि संजय राऊत यांना पराचा कावळा करण्याची सवय आहे.

नारायण राणे यांच्या ‘लाइफटाइम’ या मेडिकल कॉलेजच्या उदघाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सिंधुदुर्गात आले होते. शहा यांनी यावेळी शिवसेनेवर सडकून टीका केली होती. “अमित शहा यांच्या भाषणानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली की शिवसेनेला कुणी संपवू शकत नाही परंतु अमित शहा यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा केलीच नाही. समोरच्या व्यक्तीला टाकून बोलणं, लागेल असं बोलणं ही आमची आणि अमित शहा यांची संस्कृती नाही”, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’