हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने जोर धरला असून याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान आमच्या हातात सत्ता द्या मराठा समाजाचे आरक्षण टिकवून दाखवतो, अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
चंद्रकांतदादा म्हणाले, ज्यावेळी आमचे सरकार होते त्यावेळी आम्ही हे आरक्षण दिले व कोर्टामध्ये देखील टिकवून दाखवले होते. परंतु दुर्दैवाने महाविकास आघडी सरकारला हे आरक्षण टिकवता आले नाही. मराठा आरक्षण हे पूर्णपणे राज्याचा अधिकारात आहे याचा केंद्र सरकारशी काहीही संबंध नाही. येणाऱ्या सुनावणीमध्ये तरी सरकार पूर्ण तयारी करून उतरेल अशी अपेक्षा करूयात असे ते म्हणाले.
राज्य सरकारने येत्या दीड महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. सरकारने हे करुन दाखवले तर आम्ही तुमचा सत्कार करु. मात्र, सरकारला ही गोष्ट जमली नाही तर मराठा समाज काय करेल, हे सांगता येत नाही. मराठा समाज कायदा हातात घेणार नाही, या भ्रमात सरकारने राहू नये, असा इशारा शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी याआधी दिला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’