Thursday, February 2, 2023

पश्चिम बंगालमध्ये आमची फसवणूक झाली;चंद्रकांत पाटलांनी केला ‘हा’ आरोप

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला हादरा दिला आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 200 पेक्षा अधिक जागांवर विजयी होताना दिसत असून भाजपसाठी आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव मान्यच आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला पुरेसं संख्याबळ मिळालेलं नाही. पण पश्चिम बंगालमध्ये आमची फसवणूक झाली. डावे आणि काँग्रेसने आपली मतं तृणमूलच्या पारड्यात टाकली. त्यामुळे देशात आता हे स्पष्ट झालं आहे की भाजपा विरुद्ध सगळे. त्यामुळे वाट्टेल ते करा पण भाजपाला पराभूत करा हाच फंडा पश्चिम बंगालमध्ये चालला”, असं ते म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान पश्चिम बंगाल मध्ये भाजपने जोरदार प्रचार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ ममता बॅनर्जी यांच्या विरोधात उभे होते. तरीही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ममता बॅनर्जी यांनी हार न मानता भाजपला जबरदस्त लढा दिला. पायाला दुखापत होऊन देखील व्हीलचेअरवर बसून ममता बॅनर्जी यांनी पूर्ण राज्यात प्रचारसभा घेतल्या होत्या.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.