हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा विस्फोट मोठ्या प्रमाणात होत असून राज्य सरकार कडून पुन्हा एकदा लॉकडाउनच्या हालचाली सुरू आहेत. परंतु भाजपने मात्र लॉकडाउनला पूर्णपणे तीव्र विरोध दर्शविला आहे. लॉकडाऊन करायचा असेल तर राज्यातील एक कोटी नागरिकांना प्रत्येकी पाच हजार द्यावेत अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, या लॉकडाऊनला आमचा विरोध असणार असून लॉकडाउन हा पर्याय नाही. लॉकडाउन करणे योग्य ठरणार नाही. तसे करायचे झाल्यास, राज्य सरकारने हातावर पोट असलेल्या साधारण एक कोटी नागरिकांना प्रत्येकी पाच हजार द्यावेत,” अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. आता नाईट कर्फ्यु लागू केला. ते आम्हाला मान्य आहे. रात्री कोणाला फिरायचे असते. ज्यांना फिरायचं असतं ते तुमच्या सोबत असतात. त्यांना नाईट लाईफ हवं असतं. सर्व सामन्यांना नाईट लाईफ नको असतं, त्यांना सातच्या आत घरात चालतं,” असं म्हणत आदित्य ठाकरे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group