हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू? म्हणत जोरदार टोला लगावला होता. आता चंद्रकांत पाटलांनी देखील पवारांवर पलटवार केला आहे. माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये, अस चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील सांगली येथे बोलत होते. मला गाव सोडून जावं लागतं असं शरद पवार बोलले. पवारांना माढा मधून लढावं लागलं. मात्र पराभूत होतील म्हणून त्यांना माढा सोडाव लागलं. पक्षा पेक्षा त्यांनी स्वत:चा विचार केला. माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
शरद पवार नक्की काय म्हणाले –
पुण्यात एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा चंद्रकांत पाटलांच्या विधाना बद्दल विचारलं असता त्यावर शरद पवार म्हणाले,”त्या लोकांबद्दल मी बोलायचं का? ज्यांना आपला गाव सोडून बाहेर दुसरीकडं जावं लागतं… त्यांच्या बद्दल मी काय बोलणार?,” असा खोचक टोला पवारांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’