हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील भाजप आणि शिवसेनेतील वैर अजून वाढण्याची शक्यता आहे. काहीही करून मुंबई महापालिका निवडणुक जिंकायचीच असा चंग भाजपने बांधला आहे.मुंबई महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनीही व्यक्त केला. योग्य नियोजन, संघटनात्मक कामाची आखणी, प्रभागनिहाय लक्ष केंद्रित करून आणि प्रतिपक्षांचे बलाबल लक्षात घेऊन धोरण ठरविण्यात येत आहे अस फडणवीस म्हणाले होते. दरम्यान, गत निवडणूकी नंतर अमित शहा यांच्या सांगण्यावरूनच मुंबई महापालिका शिवसेनेसाठी सोडली अस वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
“आम्ही मुंबई महानगरपालिका भाजपाकडे घेणार आहोत. मागच्या वेळी आम्ही जेव्हा ८२ जागा जिंकलो त्यावेळी महापौर आमचाच बसला असता. परंतु अमित शाह यांनी आपल्याला राज्य चालवायचं असून मुंबई महानगरपालिका शिवसेनेला सोडा असं सांगितलं होतं. शिवसेनेचे ८४ आणि आमचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. आमचे केवळ दोन नगरसेवक कमी होते,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचे भाजपचे ध्येय आहे. त्या अनुषंगाने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने तयारी सुरु केली असून या निवडणुकीमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता आणून दाखवू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’