हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या रडारावर असलेल्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अचानकपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र लिहून भाजप सोबत जुळवून घेण्याचे आवाहन केलं. दरम्यान या लेटरबॉम्ब बाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारल असता त्यांनी सूचक वक्तव्य केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, १८ महिन्यापासून हेच घसा कोरडा होईपर्यंत सांगतोय. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांच्या सोबत संघर्ष केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. बाळासाहेबांनी अल्पसंख्याकाचा चांगुलपणावर राजकारण केलं नाही. मान खाली करायची नाही यावर शिवसेनेचे राजकारण होते. पण आता टिपू सुल्तानची जयंती साजरी करायला लागलेत.’ अशी टीका देखील त्यांनी केलीये.
ते पुढे म्हणाले, प्रताप सरनाईक हे त्यांचे नेते आहेत. आमदार आहेत. उद्धवजींनी त्यांच्या विनंतीचा विचार केला, तर आमचे नेतेही वर बसलेले आहेत. तेही विचार करतील. आता प्रताप सरनाईक यांना वाटतंय. तेच आम्ही १८ महिन्यांपूर्वी घसा फोडून सांगत होतो असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल.