हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप- प्रत्यारोप होत आहेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात खडाजंगी झाली. दरम्यान छगन भुजबळांनी या वयात तरी खोटं बोलू नये असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
बावनकुळे म्हणाले, छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते आहे, मात्र मला दुःखानं सांगावं लागत आहे की, या वयातही त्यांना खोटे बोलावे लागत आहे. २०१८ साली जेव्हा ही केस सुरू झाली तेव्हा ते तुरुंगाची हवा खात होते. या संपूर्ण केसची जबाबदारी फडणवीस यांनी माझ्यावर सोपवली होती. मी रात्र रात्र बसून या अध्यादेशावर काम केलं आणि नवा अध्यादेश तयार केला. त्यामुळे त्यांच्या या बोलण्यावर किंव येते
भुजबळ नेमकं काय म्हणाले –
भाजपनं केलेलं चक्का जाम आंदोलन हे राजकारणापोटी आहे. भाजपला दाखवून द्यायचे आहे की आम्ही ओबीसीं समाजासोबत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्व करावं आणि केंद्र सरकारकडून इम्पेरिकल डेटा मागावा असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे.