क्या हुआ तेरा वादा….जयंतराव जी; जुना व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांनी साधला निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अवैध दारूविक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी ठाकरे सरकारने चंद्रपूर मधील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याच मुद्द्यावरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा 1 जुना व्हिडिओ शेअर करत ठाकरे सरकार वर तोफ डागली.

चित्रा वाघ म्हणाल्या, “क्या हुआ तेरा वादा….जयंतराव जी सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला यवतमाळला दारूबंदी करणार, इस आश्वासन का… यवतमाळ राहिलं दूर पण चंद्रपुरची दारूबंदी उठवली तुमच्या सरकारने महिलांना कमी समजू नका अजूनही आमच्या भावनांशी असचं खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चुल फुंकायची वेळ येईल”

व्हिडिओ मध्ये जयंत पाटील नक्की काय म्हणत आहेत-

जयंत पाटील व्हिडीओमध्ये यवतमाळ मध्ये दारूबंदी करू, असे आश्वासन देत आहेत. आमचं सरकार आल्यावर पहील्या कॅबीनेटमध्ये यवतमाळ दारूबंदी करण्याचे पहीलं काम आम्ही करू, चंद्रपुरात दारूबंदी होते. तर यवतमाळ मध्ये को होत नाही, असा प्रश्न देखील जयंत पाटील यांनी व्हिडीओमध्ये उपस्थित केला आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.