पवार साहेब, भाजपची काळजी करू नका, स्वतःच्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा

sharad pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडीतील युवा नेत्यांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर घाबरू नका, मी भाजपला परत राज्यात येऊ देणार नाही असे म्हणत पवारांनी भाजपला इशारा दिला होता. त्यानंतर भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून पवारांवर जोरदार टीका करत पलटवार केला आहे. स्वतःच्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा असे थेट आव्हान भाजपने पवारांना दिले.

आदरणीय पवार साहेब, भाजपची काळजी करू नका! स्वतःच्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी 10 वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा असे आव्हान भाजपने शरद पवार यांना दिले.

आदरणीय पवार साहेब जी, भाजपला येऊ न देण्याच्या गोष्टी नंतर करा. आधी ???? हे प्रश्न सोडून दाखवा!
– राज्यात एसटी बंद, 6 महिन्यापासून कर्मचारी संपावर आहेत.
– राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे, पिकं उभं उभं करपून जात आहेत.
– मराठा, OBC आरक्षणाचा प्रश्न सोडून दाखवा.

कोण येणार? कोण नाही हे सर्व महाराष्ट्रातील जनता ठरवते. लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ असते, तुम्ही नाही. जनतेने भाजपला 105 जागा दिल्या. तुम्ही पावसात भिजूनही त्याच्या अर्धे आमदारही निवडून आणू शकला नाहीत. जनमताचा अनादर करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल! असेही भाजपने म्हंटल.