आमच्या सर्व 106 आमदाराना निलंबित केलं तरी आम्ही पर्वा करत नाही; फडणवीस आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पावसाळी अधिवेशन चालू असताना ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. कुटे, आशिष शेलार, अतुल भातखळकर , गिरीश महाजन अशा भाजपच्या बड्या नेत्यांनी गोंधळ घातल्यानंतर भाजपच्या एकूण 12 आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले. दरम्यान, १२ च काय तर संपूर्ण १०६ आमदारांना निलंबित केलं तरी आम्ही त्याची पर्वा करत नसून ओबीसी समाजासाठी संघर्ष करतच राहू असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल.

फडणवीस म्हणाले, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आम्ही सरकारला उघड पाडलं आणि केवळ या सरकारमुळे ओबीसी आरक्षण कस गेलं हे दाखवून दिल्यामुळे आमच्याबी आमदारांवर खोटे आरोप लावून निलंबीत केलं आहे असं फडणवीसांनी म्हंटल. ओबीसी आरक्षणाकरिता १२ च काय तर संपूर्ण १०६ आमदारांना निलंबित केलं तरी आम्ही संघर्ष करतच राहू असं फडणवीसांनी ठणकावून सांगितलं.

जोपर्यंत ओबीसी समाजाचे आरक्षण परत येत नाही तोपर्यंत भाजप संघर्ष करत राहील. एक वर्षच काय पाच वर्ष जरी सदस्यतत्व रद्द झालं तरी आम्ही त्याची पर्वा करत नाही असे फडणवीस म्हणाले. माझ्यावर कोणी हक्कभंग आणला तरी मला त्याची पर्वा नाही असेही ते म्हणाले.