हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बुधवारपासून राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत असून विरोधी पक्ष भाजप कडून राज्य सरकारला विविध विषयांवरून घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान या अधिवेशनापूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार वर तोफ डागली आहे. राज्यात लोकशाही नाही तर ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरु आहे असा घणाघात फडणवीसांनी केला.
उद्यापासून विधानमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या सरकारच्या परंपरेप्रमाणे जितकी लहानात लहान अधिवेशनं घेता येतील, जेवढ्या जास्तीत जास्त चर्चा टाळता येतील आणि जेवढी लोकशाही कुलुपबंद करता येईल, तेवढी करण्याचा प्रयत्न या छोट्याशा अधिवेशनातून केला जात आहे”, असं फडणवीस म्हणाले.
या सरकारने लोकशाही बंद केली आहे. या सरकारमध्ये रोकशाही सुरू आहे. आणि रोखशाही म्हणजे प्रत्येक गोष्टीला थांबवणे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.स्थगिती खंडणी लूट भ्रष्टाचार हे सर्व प्रकार या सरकारमध्ये पाहायला मिळत आहे असेही ते म्हणाले.