पुण्याचे पाणी कमी करणाऱ्यांना पुणेकरच पाणी पाजतील- फडणवीस

Devendra Fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे. याच दरम्यान पुण्याच्या पाणी प्रश्नावरून भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार वर निशाणा साधला आहे. पुण्याचे पाणी कमी करणाऱ्यांना पुणेकरच पाणी पाजतील अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. भाजप कार्यालयाच्या उद्घाटनासाठी फडणवीस पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि खास करुन राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

यावेळी त्यांनी जलसंपदा विभागाने पाणीकपात करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करून राज्य सरकारच्या कारभाराचा समाचार घेतला.पुण्यात पाणीकपात करू नये. मात्र, कोणी पाणी कमी करण्याचा प्रयत्न केला, तर पुणेकर त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत असे फडणवीस यांनी म्हंटल.

लोकसभेच्या 12 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यात शिवसेनेचे दोन खासदार होते. तेव्हा माफी मागायला आम्ही काय सावरकर आहोत का? असं शिवसेनेचे खासदार म्हणतात. अरे निर्लज्जांनो तुम्हाला लाज वाटली पाहिजे. त्यांच्या नखाची सरही तुम्हाला येऊ शकत नाही. होय आम्ही सावरकरवादी आहोत हे आम्ही ठणकावून सांगणार, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.