संजय राऊतांना जोकर म्हणणार नाही, पण ते….; फडणवीसांचा टोला

Devendra Fadnavis Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणेवर बोट ठेवले. आमच्याकडे 48 तासांसाठी ईडी दिली तर फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील अस विधान संजय राऊतांनी केलं होतं. याबाबत खुद्द फडणवीसांना विचारले असता त्यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले,संजय राऊतांना आपण जोकर म्हणणार नाही मात्र, ते रोजच जोकर सारखी स्टेटमेंट करत असतात अस म्हणत त्यांनी संजय राऊतांच्या विधानाची खिल्ली उडवली. तसेच आगामी विधानपरिषद निवडणूकीत भाजपचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यापूर्वी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही राऊतांच्या या विधानावरून टीका केली होती. या जगात प्रत्येक गोष्ट कष्टाने कमवावी लागते. भीक मागून काहीच मिळत नाही. ED तर मुळीच नाही”, असे ट्वीट करत चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना टोला लगावला होता.