Saturday, February 4, 2023

लाव रे तो व्हिडिओ ; जुने व्हिडिओ दाखवून फडणवीसांनी साधला उद्धव ठाकरे-अजित पवारांवर निशाणा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकेकाळी राज्यात भाजप-शिवसेना सरकार सत्तेत असताना अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानभरपाई साठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली होती. ‘सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली १० हजार कोटी रुपयांची मदत अतिशय तुटपुंजी आहे. या मदतीमुळे काहीही होणार नाही. सरकारनं निकषाच्या फुटपट्ट्या बाजूला ठेवून हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत तातडीनं जाहीर करावी. शेतकऱ्यांचं हेक्टरमागील नुकसान २५ ते ५० हजार रुपये इतकं आहे,’ असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. फडणवीस यांनी उद्धव यांचा तोच व्हिडीओ दाखवत मुख्यमंत्र्यांकडे आता शेतकऱ्यांना मदत करण्याची संधी आहे. त्यांनी तातडीनं शेतकऱ्यांना मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही एक व्हिडीओ पत्रकार परिषदेत दाखवला. ‘राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सरकारनं जाहीर केलेली १० हजार कोटींची रक्कम अतिशय कमी आहे. दीड ते दोन लाख कोटी रुपयांची भरपाई गरजेची आहे.आता सरकारनं तातडीनं मदत करावी,’ असं अजित पवार त्यावेळी म्हणाले होते. अजित पवारांचा हाच व्हिडीओ दाखवत फडणवीसांनी त्यांना त्यांच्या विधानाची आठवण करून दिली.

- Advertisement -

केंद्र सरकार मदत नक्की करेलच पण राज्याने केंद्रावर अवलंबून न राहता तातडीने मदत जाहीर करावी अस आवाहन फडणवीसांनी केलं.केंद्र सरकार राज्याला सहाय्य करेलच. पण राज्य सरकारनं टोलवाटोलवी न करता आधी मदतीची घोषणा करावी.प्रत्येक गोष्टीला केंद्रावर खापर फोडू नका असंही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’