हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकार वर टीका केली. महाराष्ट्रात सरकार म्हणून अस्तित्व कुठं आहे? मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक एक वाझे, ही अवस्था महाराष्ट्राची पाहायला मिळतेय. अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकार वर हल्लाबोल केला. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठकीत ते बोलत होते.
राज्यात फक्त वसुली सरकार आहे. अजून फक्त पोलीस खात्यातला वाझे समोर आला आहे. मात्र प्रत्येक खात्यामध्ये एक सचिन वाझे आहे. मंत्री आपापल्या विभागातले राजे आहे. पण प्रत्येक विभागातला वाझे आम्हाला माहित आहे. तो आम्हाला समोर आणता येऊ नये म्हणून यंदाचं पावसाळी अधिवेशन फक्त दोन दिवसांचं ठेवलं आहे.
कुठल्याही सरकारमध्ये 1 मुख्यमंत्री असतो, पण या सरकारमध्ये प्रत्येक मंत्री मुख्यमंत्री समजतो, एक निर्णय घेतला जातो, तो तासाभरात रद्द होतो, मग दुसऱ्यादिवशी पुन्हा निर्णय घेतला जातो, सरकार आहे की सर्कस आहे? असा सवालही फडणवीसांनी केला.