हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवाजी पार्क वरील गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार वर चौफेर टीका केल्यानंतर त्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत. याच दरम्यान, भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली आहे. राज ठाकरे जे बोलले ते सत्यच आहे अस फडणवीसांनी म्हंटल.
प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, राज ठाकरे बोलत आहेत ते एकप्रकारे सत्यच आहे. कारण एक क्रमांकाचा पक्ष सत्तेबाहेर असल्याचं पाहायला मिळत आहे आणि तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. भाजपाने सेनेशी युती केली. त्यामुळे सेनेच्याही चांगल्या जागा आल्या. दोघांना जनतेने बहुमत दिले. पण, त्या बहुमताचा अनादर करुन शिवसेनेने भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून तीन पक्षाची सत्ता कपटानी मिळवली.
राज ठाकरे सरकार वर बरसले-
तत्पूर्वी कालच्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी जोरदार भाषण करत महाविकास आघाडीला घायाळ केलं. महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष, दोन नंबरचा पक्ष शिवसेना आणि तीन नंबरचा पक्ष राष्ट्रवादी, असं असताना तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवतोय. मी महाराष्ट्राच्या राजकारांसोबतच देशाच्या राजकारणात असा प्रकार पाहिला नाही,” असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला. आज महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.