व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाने दमदार विजय मिळवून गोव्यातील आपली सत्ता राखली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपूर येथे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी गोवा तो झाकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

गोव्यातील यश हे कार्यकर्त्यांचे आहे. गोव्यात कार्यकर्त्यांच्या मदतीने भाजपनं संधीचं सोनं केलं. भाजपला मिळालेलं मत हे विकासाला मिळालेलं मत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीत भाजप एकहाती सत्ता आणणार आहे असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली. गोव्याच्या मतदारांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखवली आहे. शिवसेना, राष्ट्रवादीचे हे मुंगेरीलाल के हसीनं स्वप्न होते, अशी खिल्ली फडणवीस यांनी उडविली. गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादीची लढाई ही नोटाशी असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं