हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील वाद काही नवा नाही. अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा रावसाहेब दानवेंवर टीकास्त्र सोडताना जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, अशी सिंहगर्जनाच केली होती. त्यावर आता भाजप नेते आणी माजी मंत्री गिरीष महाजनांनी सत्तारांना टोला लगावला आहे.
सत्तार यांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी, हवं तर आम्ही त्यांना टोप्या पुरवू, असं गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे. अब्दुल सत्तार हे युतीतून निवडून आले आहेत. याचं त्यांनी भान ठेवावं. रावसाहेब दानवे यांचं काम मोठं आहे. त्यांच्या मतदारसंघात त्यांनी प्रचंड काम केलं आहे. त्यामुळे सत्तारांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी, हवं तर आम्ही त्यांना टोप्या पुरवू, असं, महाजन यांनी म्हटलं आहे.
नक्की काय म्हणाले होते अब्दुल सत्तार –
जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, अशी सिंहगर्जना अब्दुल सत्तार यांनी केली होती. तसेच राम मंदिराच्या नावाखाली भाजप राजकारण करत आहे. भाजपचे राजकारण म्हणजे मुँह में राम अन् बगल में छुरी सारखं आहे, अशी टीकाही त्यांनी केली. शिवसेनेशी गद्दारी केल्यानेच भाजप सत्तेबाहेर आहे. ते पुन्हा येईल, पुन्हा येईल म्हणाले. पण ते आलेच नाही. मी मात्र शिवसैनिक म्हणून नक्कीच येणार, असा टोलाही त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’