अजितदादा, तो माईचा लाल आवताडेंच्या रूपाने महाराष्ट्राला मिळालाय ; पडळकरांनी पुन्हा डिवचले

0
32
ajitdada padalkar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने ही निवडणूक एकत्र लढवली असताना देखील भाजपने इथे बाजी मारल्यामुळे महाविकास आघाडी साठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान भाजपच्या विजयानंतर गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर निशाणा साधला.

गोपीचंद पडळकर यांनी सत्ताधारी महाविकासआघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची निवडणुकीपूर्वी १५ ते २० दिवस अशी वक्तव्य होती की आम्ही ५० ते ८० हजार मतांच्या फरकाने निवडून येणार आहोत. अजितदादांचं वक्तव्य होतं की ४ पक्षांपैकी ३ पक्ष आम्ही एकत्र आहोत. असा कोणता माईचा लाल आहे जो निवडून येईल? तो माईचा लाल समाधान अवताडेंच्या रुपाने महाराष्ट्राला मिळाला आहे. असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे आविर्भावात वागत होते की आम्ही तिघं एकत्र आहोत, त्यामुळे जे आम्ही म्हणू तेच होईल. विश्वासघातानं सत्तेत येता येतं, पण लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहेत”, अशा शब्दांत पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here