महाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे? केंद्राने खुलासा करावा : जयंत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भारतात तसेच राज्यात कोरोनाची स्थिती भयावह आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून विविध राज्यात मदतीची विमाने पाठवली जात आहेत. वासनिक पाहता या विमानातील मदतीवरून राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. जलसंपदामंत्री पाटील यांनी आज माध्यमप्रतिनिधींशी संवाद साधला. महाराष्ट्र राज्यातही अशीच मदतीची विमाने येत आहेत. मात्र, या विमानातील मदत नेमकी जातेय कुठे? असा प्रश्न उपस्थित करीत त्याचा केंद्र सरकारने खुलासा करावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

कोरोना परिस्थिती व केंद्र सरकारकडून केली जाणारी मदत यावरून राज्यात भाजप व महाविकास आघाडी सरकारमध्ये मध्यन्तरीच्या काळात चांगलीच जुंपली होती. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केंद्राकडून मदत देताना राजकारण केलं जातंय, असा आरोप करण्यात आला होतो. तर भाजपतील नेत्यांकडून राज्याला केंद्राकडून भरमसाठ मदत दिली जातेय असा बोललं जात होत. त्यानंतर आता पुन्हा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केंद्राकडून पाठविल्या जात असलेल्या मदतीबाबत शंका व्यक्त केली आहे.

जलसंपदामंत्री पाटील यांनी आज माध्यमप्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते पुढे म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणात मदतीची येणारी विमान नेमकी कुजत कुठे? याचा शोध घेणारच आहोत. मात्र, त्याआधी केंद्र सरकार स्वतः याबाबत खुलासा करेल अशी अपेक्षा आहे. जलसंपदामंत्री पाटील यांनी अगोदरच पंतप्रधान मोदी यांनी राज्यच कौतुक केल्याने मोदी खरे कि फडणवीस अशी फिरकी घेतली आहे. आता पुन्हा केंद्र सरकारच्या मदतीच्या येणाऱ्या विमानावरून प्रश्न उपस्थित केले आहेत.

You might also like