हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर टीका करताना म्हंटल होत की, काही लोक म्हणायचे की मी पुन्हा येईन मात्र आम्ही काय त्यांना परत येऊ दिले नाही. त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर निशाणा साधला. पावसात भिजूनसुद्धा तुमचे 54 च आमदार निवडून आले, त्यामुळे खोट्या थापा मारणे बंद करा असे म्हणत पडळकरांनी पवारांवर पलटवार केला.
गोपीचंद पडळकर म्हणाले, “मी पवार साहेबांना सांगू इच्छितो, महाराष्ट्रात २०१९ मध्ये फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपाचे १०५ आमदार तर शिवसेनेचे ५६ असे एकूण १६१ आमदार महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना पुन्हा आणण्याकरताच निवडून दिले होते. पण आपल्या नेतृत्वात साताऱ्यात पावसात भिजूनसुद्घा फक्त ५४ च आमदार निवडून आले. त्यामुळे जनतेने तुम्हालाच निवडून दिले अशा खोट्या थापा मारणं बंद करा.
@PawarSpeaks यांचे कालचे भाषण ऐकून मी अवाक झालो. एकीकडे ते आपल्या वयाच्या मानाची अपेक्षा ठेवतात पण वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेऊन फिरतात. आपण म्हणता मी पुन्हा येऊ देणार नाही पण तुम्हाला आजपर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही. @BJP4Maharashtra pic.twitter.com/S40icqP0NK
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) March 7, 2022
“आपण म्हणता मी पुन्हा येऊ देणार नाही पण तुमच्या पक्ष स्थापनेपासून गेल्या ३० वर्षात तुम्हाला आजपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा नेता मुख्यमंत्री पदावर बसवता आला नाही. सत्तेसाठी पडती भूमिका घेणं सोपं असतं पण लोकहितासाठी सक्षम भूमिका घेणं महाकठीण असतं,” असा टोला पडळकरांनी पवारांना लगावला.