मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पडळकरांनी दिला हक्कभंगाचा प्रस्ताव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलं असताना आता ओबीसी प्रवर्गातील पदोन्नतीतील आरक्षणावरून सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सभागृहाने कायदा मंजूर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सभागृहाची होती, त्यास छेद देण्यात आल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी आपल्या हक्कभंग प्रस्तावात केला आहे. राज्य सरकारने सभागृहाची दिशाभूल केली असून अवमान केल्याचा ठपकाही या पडळकर यांनी ठेवला आहे. पडळकर यांच्या या हक्कभंग प्रस्तावामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढू शकतात.

विधिमंडळाने पारित केलेला कायदा अंमलात आणण्याची घटनात्मक जबाबदारी शासनावर असताना त्याकडे जाणीवपुर्वक डोळेझाक करुन संवैधानिक कर्तव्य टाळणे हा विधानसभेचा विशेषाधिकार भंग व अवमान आहे. त्यामुळे हा हक्कभंग प्रस्ताव दिला आहे, असंही पडळकरांनी स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment