“गंगाधर ही शक्तिमान है” असे म्हणत भाजपची राज ठाकरे यांच्यावर टीका

0
56
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी |   मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ काल सोलापूरमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत भाजपवर सडकून टीका करत राज ठाकरे यांनी मतदारांना कॉंग्रेसला मतदान करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

राज ठाकरे सभा संपल्या नंतर सोलापुरातील बालाजी सरोवर हॉटेलमध्ये गेले. त्यानंतर काही वेळाने उस्मानाबाद येथील सभा संपवून शरद पवार देखील त्याच हॉटेल मध्ये दाखल झाले. राज ठाकरे आणि शरद पवार एकाच हॉटेल मध्ये असल्याच्या बातम्या माध्यमात झळकू लागल्या नंतर भाजपने आपल्या  ट्विटरवरुन राज ठाकरे यांना झोडले आहे.

‘कर्ता’ आणि ‘करविता’ यांनी एकत्र येणे अगदीच स्वाभाविक आहे. कारण “गंगाधर ही शक्तिमान है” हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. असे भाजपच्या ट्विटमध्ये म्हणण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here