हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापनदिनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या आतपर्यंतच्या वाटचाली बद्दल भाष्य केले तसेच शिवसेनेचेही तोंडभरून कौतुक केले. यावरून भाजपने शरद पवार यांच्यावर टीका केली असून, सत्ता हेच पवारांचे धोरण असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
पवारसाहेब, २२ वर्षांपूर्वी कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला? सोनिया गांधीच्या विदेशीपणाचा पण लगेच सत्तेसाठी मुद्दा सोडून दिला. संघर्ष केला कधी? जो निर्णय घेतला तो गुंडाळला व काँग्रेससोबत सत्तेत सहभागी. आताही ज्या शिवसेनाविरोधात लढलात, त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी म्हणजे सत्ता हेच धोरण, असे केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
22वर्षांपूर्वी कोणता महत्त्वाचा निर्णय @PawarSpeaks? तर सोनियागांधीच्या विदेशीपणाचा पण लगेच सत्तेसाठी मुद्दा सोडून दिला. संघर्ष केला कधी? जो निर्णय घेतला तो गुंडाळला व कॅाग्रेससोबत सत्तेत सहभागी. आताही ज्या शिवसेनाविरोधात लढलात त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी म्हणजे सत्ता हेच धोरण https://t.co/Hg6YGurd9p
— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 10, 2021
पवार नेमकं काय म्हणाले होते –
आपण २२ वर्षांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि संघर्षाची भूमिका स्वीकारली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या २२ वर्षांचा आढावा आपण घेतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे वैशिष्ट्य राहिले की तुमच्या साऱ्यांच्या कष्टाने आणि जनतेच्या बांधीलकीने आज आपण २२ वर्षे आणि दिवसेंदिवस जनमानसात आपली शक्ती वाढवण्यासाठी आणि त्यांचा विश्वास संपादित करण्यात यशस्वी झालो.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.