हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून कोरोनाला आटोक्यात आणण अवघड बनलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकार कडून लॉकडाउन मध्ये वाढ करण्यात आली आहे. आधीच सगळं काही बंद असल्यामुळे अर्थव्यवस्था ढासळली असताना आता पुन्हा लॉकडाऊन वाढल्यामुळे सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकार वर हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे, @PawarSpeaks साहेबांना बारमालकांची काळजी, तू तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घे. वसुली सरकारवर विसंबून राहण्यात अर्थ नाहीत वसुली सरकार मध्ये पोलिसात वाजे तर लस द्यायला @FarOutAkhtar लाडका आहे, सामान्य माणसा तुच तुझा वाली
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 13, 2021
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे, शरद पवारांना बारमालकांची काळजी, तू तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घे. वसुली सरकारवर विसंबून राहण्यात अर्थ नाहीत वसुली सरकार मध्ये पोलिसात वाजे तर लस द्यायला फरहान अख्तर लाडका आहे, सामान्य माणसा तुच तुझा वाली.” असं केशव उपाध्येंनी ट्विट केलं आहे.
लॉकडाऊन पुन्हा वाढला. मुख्यमंत्री @OfficeofUT म्हणालेच होते, "माझे कुटुंब, माझी जबाबदारी!"… सामान्यमाणसा,नोकरदारा, बलुतेदारा, नोकरदारा, कष्टकरी मजुरा, तूचआहेस तुझा रक्षणकर्ता. मायबाप राज्य सरकारने तुला नव्या लाटेत वाऱ्यावर सोडले आहे. तुझा EMI, तुझ घरखर्च, तुझ लाईटबिल तुच पहा..२
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 13, 2021
याचबरोबर “लॉकडाउन पुन्हा वाढला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेच होते, “माझे कुटुंब, माझी जबाबदारी!”… सामान्यमाणसा, नोकरदारा, बलुतेदारा, नोकरदारा, कष्टकरी मजुरा, तूच आहेस तुझा रक्षणकर्ता. मायबाप राज्य सरकारने तुला नव्या लाटेत वाऱ्यावर सोडले आहे. तुझा EMI, तुझ घरखर्च, तुझ लाईटबिल तुच पहा.” असं देखील उपाध्ये म्हणाले आहेत.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.