हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्याचा भारत हा फक्त काँग्रेसच्या आणि नेहरूंच्या पुण्याई वर चालतोय अस वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता भाजप कडून राऊतांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राऊतांच्या या विधानानंतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर तोफ डागली. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्वानतंर बाळासाहेबांचे विचार ही सोडले,अशा शब्दांत शिवसेनेला लक्ष केलं.
केशव उपाध्ये यांनी ट्विट केल की ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शिवसेनेने पूर्ण सोडून दिले यांचे उदाहरण म्हणजे संजय राऊत यांची ही विधाने. देशांतील समस्यांबाबत काँग्रेसवर बाळासाहेब प्रखर टीका करायचे. आज काँग्रेसच कौतुक राऊत करीत आहेत. सत्तेसाठी हिंदुत्वानतंर बाळासाहेबांचे विचार ही सोडले,’ असा घणाघात केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे केला आहे.
शिवसेनाप्रमुख मा. #बाळासाहेब_ठाकरे यांचे विचार शिवसेनेने पूर्ण सोडून दिले यांचे उदाहरण म्हणजे @rautsanjay61 यांची ही विधाने. देशांतील समस्यांबाबत काँग्रेसवर बाळासाहेब प्रखर टीका करायचे. आज काँग्रेसच कौतुक राऊत करीत आहेत. सत्तेसाठी हिंदुत्वानतंर बाळासाहेबांचेविचार ही सोडले pic.twitter.com/JPlHQrN2v1
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 30, 2021
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते –
काँग्रेसच्याच पुण्याईवर आपला देश अजून चालत असून मोदी सरकारला आत्मचिंतनाची गरज अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकार वर घणाघाती टीका केली. तसेच मोदी सरकारच्या काळात नवीन काही झालेलं नाही, पण आपण अपेक्षा करु शकतो असंही त्यानी म्हंटल.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.