हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक येथील जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा भाजप नेते अद्वय हिरे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. हिरे यांच्या प्रवेशानंतर भाजपला मोठा धक्का बसला असून उद्धव ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. बरं झालं गद्दार गेले, म्हणून तर हिरे सापडले, अशी टीका ठाकरेंनी केली.
मुंबईत शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप नेते अद्वय हिरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी स्वाद साधला. ते म्हणाले की,
यावेळी संजय राऊत म्हणाले, अद्वय हिरे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेना आणखी दोन पावले पुढे चालेल. हिरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे पक्षाला फायदा होईल. शिवसेना संकटात असताना आपण पक्षात प्रवेश केलात, याला जास्त महत्त्व असल्याचं संजय राऊत म्हणाले. आजच्या संकटात शिवसेनेचा तुम्ही हात पकडलाय, तो तुम्ही पकडा आणि आम्ही सोडणार नाहीत.
आम्ही हे पंचवीस ते तीस वर्षं हे भोगले आहे. त्यांना पालखीत बसवून मिरवणुका काढल्या. पाम मिरवणूका काढल्यानंतर, उदो उदो झाल्यानंतर त्यांना वाटायला लागले कि हे कायमचे आपले भोई आहेत, असा टोला ठाकरेंनी लगावला.
पैसांसाठी बाप बदलणारी औलाद माझी नाही : अद्वय हिरे
भाजपचा आज त्याग मी केला असून शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी प्रवेश केला आहे. भाजपला पन्नास गद्दार मांडीवर बसवल्यापासून आमची गरज भासली नाही. कालपासून भाजपला माझी इतकी आठवण आली कि प्रदेशाध्यक्षापासून ते भाजपमधील अनेक नेत्यांचे मला फोन आले. मी त्यांना इतकंच सांगितलं कि कितीही खोके दिले तरी पैशांसाठी आणि सत्तेसाठी बाप बदलणारी औलाद माझी नाही, अशा शब्दात हिरे यांनी भाजपवर निशाणा साधला. शिवसेना सोडून अनेकजण बाहेर पडत आहे असे चित्र दाखवले जात आहे हा गैरसमज आहे. आणि या गद्दारांना आता धडा शिकवण्याची गरज असल्याची टीका हिरे यांनी केली.