हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे सरकावर नेहमी या ना त्या कारणांनी निशा साधणारे भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा ठाकरे सरकार दोन वर्षे पूर्ण करीत असल्याबद्दल सरकारवर हल्लाबोल केला आहे. “नेमकी या राज्यातील सरकारची कामगिरीच काय आहे? की ज्यावर मी बोलू. जिथे कामगिरी असते तिथे मूल्यमापन हे केले जाते. मात्र, सरकारची कामगिरीच नाही त्यामुळे मूल्यमपान करण्याचा प्रश्नच येत नाही.” असा टोला फडणवीस यांनी लगावला.
भाजप नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुटुंबीयांची घरी जाऊन आज भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील ठाकरे सरकार आपली दोन वर्ष पूर्ण करत आहे. नेमकी या सरकारची कामगिरीच काय आहे की ज्यावर मी बोलू. जिथे कामगिरी असते तिथे मूल्यमापन केले जाते. कामगिरीच नाही सरकारची त्यामुळे मूल्यमपान करण्याचा प्रश्नच येत नाही.”
शिवसृष्टीसाठी आता संपूर्ण समाजाला उभे राहावे लागेल.
आमचे सुद्धा संपूर्ण सहकार्य असेलच!
माध्यमांशी संवाद…https://t.co/oUtGBlwfSX#Pune pic.twitter.com/HvvTVsT7ZF— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 27, 2021
यावेळी फडणवीस यांनी भाजपच्या राज्यातील स्थितीबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. मात्र, मला आनंद आहे की आजही राज्यातील नंबर १ चा पक्ष हा भाजपाच आहे.”