हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील मुंबई, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार, कोल्हापुरातही विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्या नंतर नागपुरात काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दरम्यान नागपुरात भाजपच्या उमेदवाराच्या विजयाबाबत भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला आहे. भाजपचे उमेदवार माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरुद्ध कोणीही निवडणुकीत उभे राहू दे. मात्र, विजय हा बावनकुळेंचाच होणार असून नागपुरात कोणताही चमत्कार घडणारनसल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नागपुरात भाजपचाच विजय होणार आहे. काँग्रेसला अपेक्षा आहे की ते चमत्कार घडवतील. पण काहीही चमत्कार होणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे चांगल्या फरकानेच विजयी होतील यात काही शंका नाही.
संघटनात्मक बैठकीसाठी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह आम्ही दिल्लीत!
नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis यांची माहिती..@ChDadaPatil pic.twitter.com/DPtlhnqrC9— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 26, 2021
मी व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आमच्या भेटीमागचे कारण हे संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी काय करावे यासाठी चर्चा करायची हे होते. भाजपमध्ये कुठलेही संघटनात्मक बदल होणार नाहीत. संघटनेच्या पुढील वाटचालीवर बी.एल. संतोष यांच्याशी चर्चा झाली. चार पाच तास त्याच बैठकीत होतो, असेही फडणवीस यांनी सांगोतले.