ठाकरे सरकार नीच प्रवृत्तीचे; निलेश राणेंचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या ठाकरे सरकारवर अनेक प्रश्नांवरून भाजपकडून निशाणा साधला जात आहे. राज्यात सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून भाजपचे नेते तथा महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “ठाकरे सरकार नीच प्रवृत्तीचे आहे. कालपासून एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन सुरू करण्यात आले. ही ठाकरे सरकारची जात आहे, अशी घणाघाती टीका राणे यांनी केली आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करून ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “ठाकरे सरकार नीच प्रवृत्तीचे आहे, कालपासून एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन सुरू करण्यात आले व रात्री झोपलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे काम हे प्रशासनाने सुरू केले. ही ठाकरे सरकारची जात आहे, प्रश्न कधी सोडवायचे नाही पण जो आवाज उठवतो त्याला संपवण्याचे काम ठाकरे सरकारने नेहमीच केले.”

यापूर्वी निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर टीका केली होती. महाविकास आघाडीचे जवळपास सगळेच नेते काही काम नसल्या सारखे शायरी टाकून देतात. टपोरी मंत्री कव्वाली गातो, गुहागरचा वाळू चोर मिमिक्री करतो, कोण डान्सर नाचवतो, टाईम पास होत नसेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बिग बॉस मध्ये जावे, जर घेतलं तिथे तर कारण हे सगळे घरात घ्यायच्या पण लायकीचे नाही., अशी घणाघाती टीका राणे यांनी केली होती.

Leave a Comment