महाविकास आघाडीचे सरकार मायावी, सरकारला काळीज आहे का?; आशिष शेलार यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसह राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने विविध मागण्या साठी आक्रमक पावित्रा घेत संप केला जात आहे. कर्मचाऱ्यांच्या सापाला भाजपचे नेते तथा आमदार आशिष शेलार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकावर निशाणा साधला. “आताचे सरकार मायावी आहे. मायावी शब्दांचे मायाजाल पसरविणारे स्थित सरकार आहे. महाविकास आघाडीचे सरकार मायावी आहे. हे मायावी शब्दात कर्मचाऱ्यांना फसविण्याचे काम करतील. या सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत,” अशी टीका शेलार यांनी केली.

भाजप नेते तथा आमदार आशिष शेलार यांनी आज एसटी कर्मचाऱ्यांच्या सापाला भेट तिला यावेळी ते म्हणाले की, मराहारष्ट्रातील जनतेची सेवा करणाऱ्या कर्मचाऱयांना सलाम करायला मी आलो आहे. एसटी कर्मचाऱ्यांची मागणी सोपी आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला सेवा द्या. मात्र, हे सरकार शब्द फिरवत आहे. शब्दांचे मायाजाल पसरविण्याचे काम करत आहे. याच सरकारच्या प्रमुकणी सांगितले होते की, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याचा सातबारा कोरा करू, अजून असे झाले का?

या सरकारमधील नेते आपल्या मायावी शब्दांनी भुलवण्याचे काम करतील. कारण हे बसतात दुसऱ्याबरोबर आणि सरकार बनवतात तिसऱ्याबरोबर. महाराष्ट्रातील सर्व सामान्यांना फसविण्याचे काम या सरकारने केले आहे. यांच्या भूल थापांना भुलीन जाऊ नका, असे आवाहन, यावेळी शेलार यांनी केले.

You might also like