मुख्यमंत्री ठाकरेंना शेतकऱ्यांकडे जाण्यासाठी वेळ नाही; रावसाहेब दानवेंनी घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विदर्भासह मराठवाडा येथे मोठ्या प[र्मानात नुकसान झाले आहे. या ठिकाणी भाजप नेत्यांकडून भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली जात आहे. नुकसान भरपाईबाबत राज्य सरकारकडून मदत देण्यात आली नसल्याने यावरून भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “आज राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांकडे जाण्यासाठी वेळ नाही. राज्यकर्ते दुसऱ्याच कामात व्यस्त आहेत, अशी टीका दानवेंनी केली आहे.

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी सध्या नुकसानग्रस्त भागातील पाहणीसाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “राज्यांनी केंद्राला मदत मागितली तर केंद्राचे पथक या ठिकाणी येते. या ठिकाणी आल्यावर पथकांकडून नुकसानीच आढावा घेतला जातो. राज्य सराकरशी चर्चा केली जाते.

 

त्यानंतर राज्याला केंद्र सरकारकडून मदत केली जाते. आतापर्यंत केंद्राची मदत येण्यापूर्वी राज्य सरकार मदत करत असते. आणि केंद्राकडून मदतीचे पैसे आल्यानंतर ते राज्य सरकारच्या तिजोरीत जमा केला जातो. मात्र, राज्य सरकारकडून मदत केली जात नसल्याचे दिसते. ते केंद्राकडून मदत देण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आता केंद्राची वाट पाहत न बसण्यापेक्षा आपल्या बजेटमधून मदत करावी, अशी मागणी मंत्री दानवेंनी केली.

Leave a Comment