राहुल गांधींवर टीका करताना मंत्री दानवेंची जीभ पुन्हा घसरली; म्हणाले….

0
27
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान त्यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला जात आहे. आज मंत्री दानवेंची काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आहे. “”देवाला सोडलेला वळू जसा कोणत्याच कामाला चालत नाही तसेच राहुल यांचे आहे. ते कोणत्याच कामाचे नाहीत,”अशा प्रकारची टीका मंत्री दानवेंनी केली आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून जन आशिर्वाद यात्रेतून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे. यापूर्वीही मंत्री दानवेंनी अशाचप्रकारची टीका खासदार राहुल गांधींवर केली होती. दरम्यान त्यांनी आज पुन्हा टीका केली. एका कार्यक्रमात मंत्री दानवेंनी कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला की, ‘एखाद्या देवाला आपण गोरे सोडतो ना, त्याला काय म्हणतात आपल्याकडे?, त्यावेळी सांड असे उत्तर उपस्थित कार्यकर्त्यांनी दिले. त्यावर दानवे पुढे म्हणाले की, ते काय करते त्याला म्होरकी नसते, त्याला वेसण नसते. कुठे बांधायचे झाले तर त्याला ठिकाणाही नसतो. याचे कारण म्हणजे त्याला मालकच नसतो. ते कुणाच्याही शेतात जाते आणि खाते.

मंत्री दानवेंनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी चांगलेच संतापले आहेत. त्यांनी आता मंत्री दानवेंच्या विरोधात आक्रमक पावित्रा घेतला आहे. आता मंत्री दानवेंच्या राहुल गांधींवरील टीकेनंतर भाजप – काँग्रेसमधील वाद आता पुन्हा सुरु झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here