हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावरून आज भाजपकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहे. आज भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आघाडी सरकावर हल्लाबोल केला आहे. “महाविकास आघाडीने दोन वर्षे पूर्ण केलेली आहे. आमचे महाविकास आघाडीतील पक्षाशी काही वैर नाही. या आघाडी सरकारचे या दोन वर्षाचे वर्णन कमी शब्दात करायचे झाले तर असे करावे लागेल कि ‘पुत्र, पुत्र आणि पुतण्या भोवती दोन वर्ष फिरणारे सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार आहे. आणि हे सरकार म्हणजे तीन पैशांचा तमाशा आहे, अशी घणाघाती टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली.
भाजप नेते आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “आज महाविकास आघाडीला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, आजचा दिवस खऱ्या अर्थाने वेदनांच्या प्रकटीकरणाचा दिवस आहे. काही वर्षापूर्वीचे प्रसिद्ध नाटक ‘तीन पैशाचा तमाशा’ अशीच आजच्या महाराष्ट्राची परिस्थिती आहे. असंख्य वेदना जनतेला भोगाव्या लागत आहेत त्याचे सरकारला काही देणेघेण आहे का?,” असा सवाल यावेळी शेलार यांनी विचारला.
आमदार श्री. आशीष शेलार यांची पत्रकार परिषद. https://t.co/CFDwkpUney
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 28, 2021
राज्य सरकारवर टीका करत शेलार म्हणाले की, “राज्यात मंदिरासाठी लोक आंदोलन करतात पण या सरकारची भुमिका मदिरालय सुरु करायची होती. आमचा विरोध या गोष्टींना नाही तर प्राध्यान्यक्रमाने आहे. पुतण्याबद्दल काय सांगावे त्यांच्या भितीने त्यांना वरच्या पदावर बसवले जाते. मग एक हजार कोटीच्यावर बेनामी संपत्ती दिसत असल्याची टीकाही यावेळी शेलार यांनी अजित पवारांवर केली.