मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्या निमित्त केलेल्या भाषणातून केवळ जळफळाट दिसून आला. त्यात काही नवीन नव्हतं, असं सांगतानाच या भाषणात भाजपची दहशत होती याचाच आनंद झाला, अशी खोचक टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात भाजपवर जोरदार टीका केली होती. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या टीकेचा समाचार घेतला.
”आम्ही खऱ्या अर्थाने हिंदू संस्कृती जपणारे आहोत. दसऱ्याच्या दिवशीही कुणाचंही वाईट चिंतू नये, वाईट बोलू नये अशी आपली परंपरा आहे. आम्ही ही परंपरा जपतो, असं सांगतानाच काल त्यांनी मात्र या परंपरेला तडा दिला. त्यांच्या संपूर्ण भाषणात जळफळाट होता. या भाषणात भाजपचीच दहशत पाह्याला मिळाली. याचा आम्हाला आनंद आहे. अर्णव गोस्वामी आणि कंगना रनौतने जी काय वाट लावली, त्याचं दडपण या भाषणात होतं. हे भाषण म्हणजे ओटीटीवरचा महा फ्लॉप शो होता,” असा खोचक टोला शेलार यांनी लागवला. (bjp leader ashish shelar reaction on cm uddhav thackerays dussehra rally speech)
शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे सत्तेसाठी पांघरलेली शाल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्वाची मांडलेली व्याख्या म्हणजे त्वचा आहे. तर शिवसेनेचं हिंदुत्व ही शाल आहे. सत्तेसाठी पांघरलेली ही शाल आहे. शाल आणि त्वचेची तुलना होऊच शकत नाही. उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व हे भेसळयुक्त झालं आहे. त्यांना हिंदुत्वासाटी आमच्याकडून सर्टिफिकेट घ्यावं लागेल. एवढेच नव्हे तर काळ्या टोपीकडूनही घ्यावं लागेल, असं सांगतानाच टाळ्या आणि थाळ्यांचा हिंदुत्वाशी काहीच संबंध नव्हता. कोरोना योद्ध्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून केलेली ती कृती होती, असंही ते म्हणाले. (bjp leader ashish shelar reaction on cm uddhav thackerays dussehra rally speech)
कोरोना झालेल्या १६ मंत्र्यांपैकी एकही जण फडणवीसांप्रमाणे सरकारी रुग्णालयात भरती का झाला नाही? भाजपचा सवाल
वाचा सविस्तर -👉 https://t.co/C6Zv9L2gMc@Dev_Fadnavis @CMOMaharashtra #HelloMaharashtra @ChDadaPatil #coronavirus— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 26, 2020
१ नोव्हेंबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे 'हे' नियम बदलणार
वाचा सविस्तर -👉 https://t.co/Voao0PcvGk#finiancialnews— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 26, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in